समलिंगी संबंध – समज आणि गैरसमज

Homosexuality concept and misconception

जगात सर्वत्र बर्‍याचवेळा विरुद्धलिंगी आकर्षण, संबंध ही ग्राह्य धरले जातात हे तितकेच हे देखील सत्य आहे की समलिंगी आकर्षण स्त्री व पुरुष दोघांमध्ये पूर्वापार दिसून येते काही संस्कृतीमध्ये, समाजामध्ये ते ग्राह्य म्हटले जाते हे ‘समलिंगी’ माणसाच्या आयुष्यातील सर्वच थरात कोठे न कोठे दिसून येतात.

समलैंगिकतेला Homosexuality म्हणतात (होमोसेक्स्युयॅलिटी) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘होमो’ म्हणजे सारखे (Same) यावरून पडला. किन्से या शास्त्रज्ञानुसार 10% अमेरिकन पुरुष वयाच्या 16 ते 50 वर्षांपर्यंत जवळजवळ 3 वर्षे तरी पूर्णपणे समलिंगी असतात. 4% पुरुष आयुष्यभर समलिंगी राहतात. तर स्त्रियांमध्ये वयाच्या चाळीस वर्षापर्यंत 19% स्त्रिया समलिंगी अनुभव घेतात तर 3% स्त्रिया आयुष्यभर समलिंगी राहतात. हे सर्वेक्षण परदेशातील आहे.

समलैंगिक व्यक्ती त्याच्या समलिंगी व्यक्तीकडेच का आकर्षित होते याचे मूळ कारण अजून सापडले नाही संस्कारानुसार आनुवंशिक दोष, मानसिक संतुलन, मानसिक विकृती अशी अनेक कारणे सांगितली जातात. पण ठोस कारण मिळाले नाही. वरील कोणतेही कारण म्हणता येत नाही. 1974 नंतर समलैंगिक संबंध हे प्राकृत मानले गेले. भारतात जवळजवळ साडेचार कोटी समलैंगिक ठेवणारे स्त्री-पुरुष आहेत. पुरुष समलिंगीना ‘गे’ म्हणतात. तर स्त्री समलैंगिकांना ‘लेस्बियन’ म्हणतात. स्त्री-पुरुष संबंधामध्ये, जसे शारीरिक सुख घेताना क्रिया घडतात. तसेच समलिंगी संबंधात सर्व क्रिया घडतात. उदा. मुखमैथुन, कामक्रिडा, परहस्तमैथुन, गुदमैथुन (पुरुष समलिंगीमध्ये) तरी देखील सर्वच समलिंगी पुरुष गुदमैथुन करतात असे नाही. स्त्रियांमध्ये स्तन, शिश्निकेचे मर्दन करून कामपूर्ती मिळवतात.

जसे स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाविषयी समज/गैरसमज आहेत तसेच स्त्री-पुरुषांमधील समलैंगिकतेबद्द्ल गैरसमज आढळतात.

1) समलिंगी स्त्री अतिकामुक असते. तिची इच्छा पुरुष पूर्ण करू शकत नाही.

2) तिची भगशिश्निका मोठी असते.

3) या स्त्रियांना पुरुषांचा द्वेष असतो.

4) अशी स्त्री कामजीवनात अतिशय कुशल असते.

वरीलपैकी कोणतेही वाक्य खरे नाही.

समलिंगी स्त्रीला चांगला पुरुष मित्र असू शकतो त्या पुरुषांचा द्वेष करीत नाहीत. भगशिश्निकेचा आकार नॉर्मलच असतो. कामवासना देखील विरुद्धलिंगी आकर्षणातील स्त्रीमध्ये असते तशीच असते. इतर स्त्रियांसारखेच समलिंगी स्त्रीचे शरीर सारखे असते. वेगळेपण असे काहीच नसते. पेहेराव, भाषा, चालणे यावरून समाजात वावरताना समलिंगी स्त्री वा पुरुष ओळखता येत नाहीत.

यामध्ये कायमस्वरूपी वा तात्पुरते, परिस्थितीनुरुप समलिंगी संबंध ठेवणार्‍यांवर उपचार करून विरुद्धलिंगी आकर्षण निर्माण करता येत नाही हे लक्षात ठेवावे. तसेच समलिंगी स्त्रीचे लग्न करून दिले तर पतीबरोबर विरुद्धलिंगी आकर्षण तयार होईलच असे समजू नये. ज्या समलिंगी स्त्री-पुरुषांच्या मनात असेल तरच ते यातून बाहेर पडू शकतात. इच्छेविरुद्ध दुसर्‍यांच्या दबावाखाली समलिंगी असलेले आकर्षण बदलता येत नाही.

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांच्या भाषा, चालणे, बोलणे, पेहेराव यावरून तो पुरुष समलिंगी आहे असे सांगता येत नाही. पुरुषांच्या सामान्यतः एकमेकांच्या शरीरावर लिंग मर्दन करून वीर्यपतन करणे, कामपूर्ती मिळवणे अशी कामक्रीडा असते.

स्त्रियांप्रमाणेच पुरुष समलिंगीयांमध्ये गैरसमज असतात ते म्हणजे अशा पुरुषांचे लिंग फारच मोठे असते, गुदमैथुनाची आवड असते, खूप कामुक असतात, स्त्रियांशी दुश्मनी असते. इ. अर्थातच याला शास्त्रीय आधार काहीच नाही. प्रत्यक्ष लैंगिक संबंधासाठी कामकीडा जी केली जाते त्यामध्ये विरुद्धलिंगी आकर्षणामध्ये जसे घडते तसेच समलिंगी आकर्षणामध्ये शरीराचा प्रतिसाद कामुक स्पर्शाला मिळतो. मुखमैथुनाने स्त्री-पुरुष संबंधात जवळजवळ 99% कामपूर्ती मिळते.

98% स्त्री समलिंगी संबंधात योनीला उद्दिपीत केले जाते. 97% स्त्रिया स्तनाला हाताने स्पर्श करण्यात सुख मानतात, 85% स्तनाला मुखाने उद्दिपीत करतात, 78% योनीमुखमैथुनाने कामपूर्ती मिळवतात. 56% स्त्रिया जननेंद्रियांचे घर्षण करतात. यामध्ये एक स्त्री पुरुषाप्रमाणे लिंगाचा आकार असलेले डिल्डो/व्हायब्रेटर बेल्टसहित स्वतः परिधान करते व दुसर्‍या स्त्रीसोबत संभोग करून सुख मिळवते.

परदेशात या संबंधाविषयी कायदा आहे. समलिंगी विवाह करून एकत्र राहू शकतात. भारतात असा कायदा अजून आला नाही. पण त्याचे वारे वाहू लागले आहेत. भारतातील सहा मोठ्या शहरांमधून हजारो पुरुषांनी समलिंगी संबंध ठेवल्याचे कबुल केले. दिल्लीमधील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये फेब्रुवारी 2002 रोजी समलिंगीयांसाठी मेळावा भरविला होता. भारतातील या विषयाला वाहिलेली काही मासिके चीन, नेपाळ,पाकिस्तान, श्रीलंका येथे वाचकवर्ग मिळवत आहेत. राक्षी, कहर, त्रिकोण, इकेलॉन असे मासिक, त्रैमासिक या लोकांसाठी प्रकाशित केले जाते.

प्रगत देशात या वृत्तीला मान्यता दिली असली तरी भारतात अजून नाही, खरे तर शास्त्रीय माहिती लक्षात घेऊन समलैंगिकतेला मान्यता देण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी. समलिंगी संबंध ही विकृती नाही हे प्रथम लक्षात घ्यावे. तसेच भारतात नव्हतेच/नाही असेही म्हणणे योग्य नाही. मोठमोठ्या पार्ट्या, संस्था यातून हे दिसून येते.

समाजात राहताना लोक काय म्हणतील? या भीतीपोटी समलिंगी स्त्री-पुरुष घरातील लोकांच्या दबावाखाली स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्नास तयार होतात व पुढील विरुद्धलिंगी साथीदाराचे जीवन अडचणीत टाकतात. फक्त पुढची पिढी चालू रहावी याखातर शरीरमीलनास एकत्र येऊन गर्भधारणा ठेवू इच्छितात. प्रत्यक्षात सांसारिक सुखात ते मनापासून सहभागी होत नाहीत, असे काही पुरुष व स्त्रिया माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. असे करताना विवाहानंतर देखील समलिंगी संबंध साथीदाराला समजून आले तर संसारात काहीसे वाद निर्माण होणे व घटस्फोटापर्यंत वेळ येते. यातून दोघांना निर्माण होणारा मानसिक ताण, कुटुंबावर होणारा परिणाम हे सर्वांनाच दुःख देत राहते. विरुद्धलिंगी आकर्षणातून, दूषित लैंगिक संबंधातून जसे HIV/AIDS चा धोका आहे. तसाच समलिंगी संबंधात एड्सचा धोका आहेच.

वर सांगितल्याप्रमाणे सर्वच समलिंगी पुरुष गुदमैथुनाचा अनुभव घेत नाहीत. पण एकापेक्षा जास्त पुरुषांची दूषित लैंगिक संबंध येत राहिले तर याची शक्यता बळावते. याचबरोबर काविळीचा प्रसार होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे HIV/AIDS प्रसार थांबविण्यासाठी समलिंगी संबंध ठेवणार्‍या स्त्री-पुरुषांमध्ये सुरक्षीत संभोगाची शास्त्रीय माहिती योग्य पद्धतीने पसरवावी लागेल.